• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

संशयातून पत्नीची हत्या साठ वर्षीय पतीला जन्मठेप

suraj madurwar by suraj madurwar
May 9, 2026
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
संशयातून पत्नीची हत्या  साठ वर्षीय पतीला जन्मठेप
Spread the Information

गोंडपिपरी: (सुरज माडूरवार)

RelatedPosts

संतोषसिंह रावत यांची गोंदिया जिल्हा व विधानसभा प्रभारीपदी निवड

मुलमध्ये देवी विसर्जनातील गुन्हे मागे घ्या; भाजप महिला मोर्चाची मागणी

मुलमध्ये देवी विसर्जनातील गुन्हे मागे घ्या; भाजप महिला मोर्चाची मागणी

चंद्रपूर: कौटुंबिक कलह आणि संशयाचे भूत किती भयानक असू शकते, याचे दाहक वास्तव गोंडपिपरी तालुक्यातील कुडेसावली येथील घटनेतून समोर आले आहे. आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची निर्घृण हत्या करणाऱ्या ६० वर्षीय नराधम पतीला चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची अद्दल घडविली आहे. मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. प्रकाश कदम यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला असून, समाजात गुन्हेगारांवर वचक बसवणारा हा संदेश मानला जात आहे.

ही हृदयद्रावक घटना १२ सप्टेंबर २०२४ रोजी मौजा कुडेसावली येथे घडली होती. आरोपी धनपाल माधव रामटेके याने वयाच्या साठाव्या वर्षीही आपल्या पत्नीच्या, वंदना रामटेके यांच्या चारित्र्यावर संशय घेतला होता. याच वादातून त्याने रागाच्या भरात धारदार चाकूने वार करून स्वतःच्या पत्नीचा जीव घेतला. या घटनेमुळे संपूर्ण गोंडपिपरी परिसरात खळबळ उडाली होती. आपल्या आईच्या हत्येनंतर मुलगा अमर रामटेके याने दिलेल्या तक्रारीवरून कोठारी पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कोठारी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खरसान यांनी अत्यंत सखोल आणि तांत्रिक पुरावे गोळा करून या प्रकरणाचा तपास केला. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. खटल्यादरम्यान सरकारी अभियोक्ता श्री आसिफ शेख यांनी सरकार पक्षाची बाजू खंबीरपणे मांडली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अहवाल आणि केमिकल अनालायझर रिपोर्ट यांसारख्या सबळ पुराव्यांमुळे आरोपीला पळवाट उरली नाही.

न्यायालयाने भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३(१) अन्वये आरोपी धनपाल रामटेके याला दोषी ठरवून आजीवन कारावास आणि ३,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जर आरोपीने दंड भरला नाही, तर त्याला अतिरिक्त एक महिना साधा कारावास भोगावा लागेल, असेही निकालात स्पष्ट करण्यात आले आहे. या यशस्वी तपासात सपोनी योगेश खरसान यांच्यासह पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलीस शिपाई मनीषा गोवर्धन चिवंडे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. म्हातारपणात आधार देणाऱ्या जोडीदाराचा असा क्रूर अंत केल्याबद्दल न्यायालयाने आरोपीला कोणतीही दया न दाखवता कडक शासन केले आहे.

Previous Post

खनिज कल्याण योजनेत ९५% अनुदानाची मोठी संधी;सेंद्रिय शेती व रोजगारासाठी शेतकऱ्यांना आव्हान

Next Post

अहमदपूरमध्ये जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड; 9 आरोपींवर कारवाई, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

suraj madurwar

suraj madurwar

सुरज माडूरवार हे दैनिक सह्याद्रीचा राखणदारचे २०१६ पासून गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे .

Next Post
अहमदपूरमध्ये जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड; 9 आरोपींवर कारवाई, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदपूरमध्ये जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड; 9 आरोपींवर कारवाई, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

November 1, 2026
अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

November 1, 2026
लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत सीआरपीएफची ‘रन फॉर युनिटी’; एकतेचा दिला संदेश!

लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत सीआरपीएफची ‘रन फॉर युनिटी’; एकतेचा दिला संदेश!

November 1, 2026
आष्टीच्या अपर तहसीलसाठी डॉ. अशोक नेते सरसावले;वगळलेले नाव पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी

आष्टीच्या अपर तहसीलसाठी डॉ. अशोक नेते सरसावले;वगळलेले नाव पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी

October 30, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1