सिंधुदुर्ग वृतांत : सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील तरूणाला शुल्लक पैशासाठी नग्न करून त्याचा खून करण्यात आला आहे. ही घटना बीड पेक्षाही मोठी गंभीर असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे.
या प्रकरणाची सर्व सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी वैभव नाईक यांनी केली आहे.
कुडाळ मधील बिडवाडकर हा तरुण 22 हजार रूपये देऊ शकला नाही म्हणून त्यांची निघृणपणे हत्या करण्यात आली.
ह्या सर्व प्रकारामागे शिवसेनेचा पदाधिकारी असून त्याला स्थानिक आमदार आपले अधिकार वापरून वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
तसेच पोलिसांवर सुध्दा दबावा टाकण्यात येत आहे असा गंभीर आरोप सुध्दा शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.













