गोंडपिपरी – (सुरज माडूरवार)
मनात जिद्द व चिकाटी असेल तर शेतीत भरघोस उत्पन्न घेता येऊ शकते. शेतीमध्ये उत्पन्न पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याने आर्थिक आधार मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जाते. मात्र गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथील गृहिणी शेतकरी नंदिनी लाडधरे यांनी हा दावा खोटा ठरवत घर सांभाळत रेशीम शेतीतून भरघोस उत्पन्न घेऊन आर्थिक समृध्दी साधली आहे.
विदर्भातील शेतकरी विशेषता चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी, मूल,सावली व पोंभूर्ना तालुका धानपट्ट्याचा भाग म्हणून ओळखला जातो.यापूर्वी धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात शेतकरी घेत होते मात्र निसर्गाच्या अवकृपेने धानाच्या पिकाचे नुकसान होत होते.त्यामुळे शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडत होती.लावलेला पैसाही निघत नसल्याने शेतकरी आत्महत्या करायला पुढे धजावत असल्याचे चित्र बघायला मिळते.धाना पेक्षा रेशीम शेतीतून आर्थिकदृष्ट्या सक्षम व अनेक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी वढोली येथील शेतकरी नंदिनी लाडधरे यांनी पुढाकार घेतला.आपल्या शेतात त्यांनी मत्स्यव्यवसायासोबत नवीन प्रयोग करून रेशीमचे उत्पन्न घेतल्याने बाजारपेठेत मागणी आहे.त्या उत्पन्नातून आर्थिक समृद्धी साधता येते हे हेरून नंदिनी शेतात राबत रेशीम चे उत्पन्न घेतले.वर्षातून चारदा रेशिमचे उत्पन्न घेत असून २१ दिवसात उत्पन्न काढत असून आर्थिक उन्नती साधत आहे.त्यामुळे नंदिनी शेतकऱ्यांचे प्रेरणास्त्रोत बनत आहे.

मंगळवार दि.(१५) जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी गोड पिंपरी तालुक्याच्या दौऱ्या दरम्यान करंजी येथील प्रभाग संघ दाल मिलची भेट देऊन पाहणी केली.वढोली येथील पांदण रस्त्याची,मनरेगा विहीर कामाची पाहणी केली. सकमुरातील बचत गटाचे मत्स्यबीज व्यवसायाला भेट दिली.तोहगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी,पाचगाव येथील बांबू व्यवस्थापन केंद्रास दौऱ्यादरम्यान भेट दिली. दरम्यान वढोली येथील (कोसा)रेशीम उद्योग शेतीला भेट देऊन पाहणी केल्यानंतर महिला शेतकरी नंदीनीचे कौतुक करून इतरही महिलांनी व शेतकऱ्यांनी आदर्श घ्यावा असे आवाहन केले.यावेळी उपविभागीय अधिकारी रवींद्र माने,तहसीलदार शुभम बहाकर,ठाणेदार रमेश हत्तीगोटे,नायब तहसिलदार शेखर वेटे,संवर्ग विकास अधिकारी अरुण चनफने,मंडळ अधिकारी सुकेसणी कांबळे, बैस,रेशीम अधिकारी वायकोर,देवानंद चौधरी,नितेश दुर्योधन,कुणाल पाझारे, मुख्याधिकारी विवेक चौधरी,सरपंच राजेश कवठे, तलाठी दीपक झाडे,अश्विनी शेळके,विनोद झिले,मंदा आत्राम,अरुण भोयर,जितेंद्र लोडे,वासुदेव लाढधरे यांची उपस्थीती होती.













