मुंबई : मराठीच्या मुद्यावर मनसेच्या खळ्ळकट्याक नंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून गांधीगिरी सुरू करण्यात आली आहे.
ठाकरेंची शिवसेना हिंदी भाषिकांना पाठशाळेच्या माध्यमातून मराठी शिकवणार आहे.
महाराष्ट्रात मराठीच्या सक्तीसाठी मनसे चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाली होती. मात्र मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं देखील मराठीसाठी एक मोहीम हाती घेतलीय.
हिंदी भाषिकांना मराठी शिवकवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं एक उपक्रम हाती घेतलाय. दरम्यान मनसेच्या खळ्ळखट्याकला ठाकरेंची शिवसेना गांधीगिरीनं उत्तर देणार आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबईत मराठी की पाठशाला हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ज्या नागरिकांना मराठी येत नाही त्या नागरिकांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून मराठी शिकवण्यात येणार आहे.
13 तारखेला ठाकूर कॉम्प्लेक्स इथे मराठी की पाठशाळा या उपक्रमाचा शुभारंभ आदित्य ठाकरेंच्या हस्ते होणार आहे.













