रांजणगावमध्ये गुटखा तस्करी प्रकरण; पोलिसांकडून 9 लाखांचा मुद्देमाल जप्त
रांजणगाव गणपती (ता. शिरूर) – राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीवर रांजणगाव पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 9,09,000 रुपये किमतीचा गुटखा आणि टाटा पंच कंपनीची विना नंबर असलेली कार जप्त केली आहे. या प्रकरणी शेखर भगवान अभंग (वय 25, रा. मंगलमूर्ती शाळेजवळ, रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी झाली कारवाई
दि. 31 मार्च 2025 रोजी सकाळी 10:45 वाजता अहमदनगर-पुणे हायवेवरील यशवंत चौक, कारेगाव (ता. शिरूर) येथे पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बाबासाहेब झेंडे (बक्कल नंबर 2819) यांनी संशयास्पद कार थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहनचालक पोलिसांना पाहून गाडी सोडून फरार झाला. पोलिसांनी कारची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणावर गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ सापडले.
जप्त मुद्देमाल:
1. आर.एम.डी. पान मसाला – 04 बॉक्स (किंमत 3,600 रुपये)
2. केसर युक्त गोवा 1000 – 10 पुडे (किंमत अद्याप स्पष्ट नाही)
3. विमल पान मसाला – 20 पुडे (किंमत 2,400 रुपये)
4. सम्राट पान मसाला – 25 पुडे (किंमत 3,000 रुपये)
5. टाटा पंच फोर व्हीलर (विना नंबर) – किंमत अंदाजे 9 लाख रुपये
एकूण जप्त मालाची किंमत: 9,09,000 रुपये
गुन्हा दाखल व पुढील तपास
महाराष्ट्र राज्यात अन्न व सुरक्षा मानके कायदा 2006 आणि अन्नसुरक्षा आयुक्तांच्या आदेशानुसार गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्रीवर बंदी आहे. तरीही आरोपीने प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याची वाहतूक करताना कायद्याचे उल्लंघन केले.
रांजणगाव पोलीस ठाण्यात आरोपी शेखर भगवान अभंग याच्याविरुद्ध कलम 223 भा.दं.वि. आणि अन्न व सुरक्षा मानके कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपासादरम्यान आरोपीची ओळख पटली असून, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांचा पुढील तपास सुरू
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार गणेश आगलावे (बक्कल नंबर 1162) करत आहेत. पोलीस निरीक्षक, रांजणगाव पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आहे













