मुंबई : आज विधिमंडळाच्या अधिवेशनावेळी पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू यांनी सरकारच्या धोरणांची तुलना औरंगजेबाशी केलेली बघायला मिळाली.
पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की, निवडणुकीच्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन आम्ही पूर्ण कर्जमाफी करू असं म्हंटलं होतं. पण आता ते आश्वासन फॉल ठरलं आहे. प्रभू रामचंद्राची शपथ मोडली गेली.
रामराज्य आलं पण देवेंद्रजींनी शपथ मोडली. त्यामुळे मी उद्यापासून 21 ते 23 पर्यंत रायगडच्या पायथ्याशी पाचाड या गावी जिजाऊंच्या समाधीजवळ अन्नत्याग आंदोलन सुरू करणार आहे. इथून शक्ती घेऊन महाशक्तीत आम्ही दिव्यांग, शेतकरी यांच्यासाठी आम्ही लढणार आहे, असंही यावेळी बच्चू कडू म्हणाले.
याबद्दलची माहिती त्यांनी आज विधिमंडळाच्या अधिवेशनावेळी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की, निवडणुकीच्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन आम्ही पूर्ण कर्जमाफी करू असं म्हंटलं होतं. पण आता ते आश्वासन फॉल ठरलं आहे.
सरकारला सांगायचं आहे की, हिंदू शेतकऱ्यालासुद्धा पोट असतं. तो उपाशी आहे. तलवारीने जेवढे मारले जातात त्यापेक्षा धोरणाने किती मेले? जेवढे औरंगजेबाने नाही मारले तेवढे सरकारने मारले आहेत.
एवढी मारामारी जर धोरणामुळे होत असेल तर हे औरंगजेबाचं कृत्य थांबवणारं कोणी कुठं जन्माला येईल का? याचा विचार आम्ही करत हे, अशी खरमरीत टीका प्रहारचे माजी आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू उद्यापासून 3 दिवस अन्नत्याग आंदोलनाला बसणार आहेत













