कोल्हार │ छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजघटकांना एकत्र आणून स्वराज्याची स्थापना केली. मात्र, सध्याच्या परिस्थितीत जातीय तणाव वाढत असून, समाज एकमेकांच्या विरोधात उभा ठाकला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून द्वेष पसरवला जात आहे. अशा परिस्थितीत शिवरायांचे विचार आचरणात आणण्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच ॲड. सुरेंद्र खर्डे यांनी केले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उपजिल्हाप्रमुख अनिल बांगरे यांच्या वतीने कोल्हार भगवतीपूर येथे तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. भगवती देवीच्या नव्याने बांधलेल्या भव्य स्वागत कमानीजवळ मराठमोळ्या सनई-चौघड्यांच्या निनादात शिवप्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कोल्हार भगवतीपूरचे सरपंच दत्तात्रय राजभोज, उपसरपंच प्रकाश खर्डे, ज्ञानेश्वर खर्डे, अनिल खर्डे, धनंजय दळे, पंढरीनाथ खर्डे, अजित मोरे, वसंत खर्डे, अनिल हिरानंदानी, आबा खर्डे, स्वप्निल लोखंडे, अक्षय मोरे, श्याम लोखंडे, संतोष थेटे, संदीप खर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवजयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी सागर मोरे, विजय गोहर, पप्पू जोर्वेकर, विजय मोरे, सागर बांगरे, युवराज बांगरे, नंदू वाकचौरे, मोहित भोंडे यांनी विशेष प्रयत्न केले.
ॲड. सुरेंद्र खर्डे यांनी गावातील सर्व जाती-धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन एकोपा आणि सलोखा टिकवावा, जातीय तेढ गावाच्या वेशीवर ठेवावी, असे आवाहन केले.













