बदलापूर प्रतिनिधी: बदलापूर पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरील पादचारीपुला खालील मद्यपी रात्रीच्या वेळेत दारू पिण्यास बसतात. दारूच्या बाटल्या, चाखण्यासाठी आणलेले खाद्यपदार्थ तेथेच टाकून निघून जातात तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणात निरोधकाचे पॅकेट सुद्धा पडलेले आहेत यामुळे पुणे स्वारगेट मधल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी रेल्वे पोलिसांनी त्या तळीरामांवर कारवाई करून या परिसरात कोणता अनुसूचित प्रकार घडत तर नाही! इतक्या मोठ्या प्रमाणात निरोधक पॅकेट या परिसरात कशी ! यांची चौकशी होऊन कारवाईची मागणी जोर धरू लागला आहे
या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून प्लास्टिकच्या पिशव्यांमधून हे साहित्य आणले जाते. दारूच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या, नासाडी झालेले खाद्य पदार्थ या भागात पडलेले असते तसेच हा परिसर तळीरामांचा अड्डा बनले आहे. येथील मद्यविक्रीच्या दुकानातून लोक दारू विकत घेतात आणि तिथेच खुलेआम दारू पितात. एवढेच नव्हे, तर भररस्त्यात पेंगतात. कुणी तिथेच लोळत पडतात. दारू चढल्यावर हे तळीराम आपसात जोरजोरात भांडतात. यामुळे परिसरातून जाणाऱ्या महिलेच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाले आहे













