जुन्या वादातून मारहाण – तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
शिरूर प्रतिनिधी – रमेश बनसोडे
शिरूर : जुन्या वादाच्या कारणावरून एका व्यक्तीला मारहाण करून दुखापत केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी नितीन दादा कुचेकर (वय 36, व्यवसाय – मजुरी, रा. इनामगाव वाळूजपट, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी संतोष दादा कुचेकर, शितल संतोष कुचेकर आणि गुणाबाई दादा कुचेकर (रा. इनामगाव वाळूजपट) यांनी त्यांच्यावर हल्ला केला.
दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी 7 ते 8 वाजेदरम्यान, फिर्यादी आपल्या घरासमोर असताना आरोपी संतोष कुचेकर यांनी शिवीगाळ करून लाकडी बांबूच्या काठीने मारहाण केली. त्यात त्यांना दुखापत झाली. तसेच, आरोपी शितल संतोष कुचेकर आणि गुणाबाई कुचेकर यांनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीला हात पकडून ओढून खाली पाडले व शिवीगाळ केली.
याप्रकरणी फिर्यादीने शिरूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर भारतीय दंड संहितेच्या कलम 118(2), 352 आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस हवालदार खबाले करत आहेत.













