मांडवगण फराटा येथे 13 वर्षीय मुलगी बेपत्ता – गुन्हा दाखल
शिरूर प्रतिनिधी – रमेश बनसोडे
शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे एका 13 वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी कालिदास आभिश काळे (वय 39, व्यवसाय – मजुरी, रा. कोळपेवस्ती, मांडवगण फराटा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 3 मार्च 2025 रोजी रात्री 1:30 ते पहाटे दरम्यान त्यांची मुलगी आलकनंदा कालिदास काळे (वय 13 वर्षे) ही घरात झोपेत असताना अचानक बेपत्ता झाली. कुटुंबीय सकाळी उठल्यानंतर ती आढळून न आल्याने तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र, कुठेही तपास न लागल्याने अखेर शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
मुलीचे वर्णन: रंग निमगोरा, सरळ नाक, लांब केस, काळे डोळे. ती बेपत्ता होताना लाल-हिरव्या रंगाची साडी परिधान केलेली होती.
या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 137(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा वारे करीत आहेत.













