ढगा भूवन: महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर ढगा येथील प्राचीन शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. लहान महादेव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पवित्र स्थळी दुपारपर्यंत ७० हजारांहून अधिक भक्तगणांनी दर्शनाचा लाभ घेतला.
यात्रेकरूंच्या सुविधेसाठी जिल्हा प्रशासन, बोर व्याघ्र प्रकल्प आणि प्रहार समाज जागृती संस्थेच्या स्वयंसेवकांनी विशेष सेवा प्रकल्प राबविला. यात्रेच्या व्यवस्थापनासाठी स्वयंसेवकांनी मोठी भूमिका बजावली. गर्दी नियंत्रण, पिण्याच्या पाण्याची सोय, महिला व ज्येष्ठ नागरिकांना मदत, प्रथमोपचार व्यवस्था, जंगल व पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती आणि पोलिस व वन विभागाला सहकार्य अशा विविध सेवा दिल्या.
या सेवा प्रकल्पाचे नेतृत्व प्रहार समाज जागृती संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन मोहन गुजरकर, रोव्हर लिडर संतोष तुरक, रासेयो जिल्हा समन्वयक प्रा. रवींद्र गुजरकर आणि गणेश शेंडे यांनी केले. एस. एस. एन. जे. महाविद्यालयातील रोव्हर, रेंजर आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

यामध्ये प्रणव मेश्राम, प्रतीक मडकाम, आदर्श नाईक, मनोज नेहारे, वैष्णवी शिरभाते, साक्षी पारीसे, कोमल शितळे, श्रद्धा मडावी, मनीषा मडकाम, रसीका बानकर, खुशी पचारे, शितल आष्टकार, वैष्णवी कन्नाके, निशा कांबळे, लक्ष्मी कावळे, अंजली झाडे, गायत्री पदीले, प्राप्ती मांढरे, अंजली कामडी, सुजल पराते, पायल चौके, मयूरी पेटकर, कांचन राऊत, पूर्वा कापटे, गौरी खडसे, सलोनी अजमिरे, समीक्षा नेवारे, यश साटोणे, व्हिकी पेंदोरकर, उदय काळे, शुभम पारीसे, कुंदन कावडे, दुर्गेश पोटे, गिरीधर नेहारे, अभिषेक नेहारे, वेदांत कन्नाके, साहील रामगडे, युवराज डफरे, निशांत शितळे, शूरतिका कोल्हे यांसह अनेक स्वयंसेवकांनी आपले योगदान दिले.

प्रहार संस्थेच्या या उपक्रमामुळे यात्रेकरूंना सुरक्षित व आनंददायी अनुभव मिळाला. महादेवाच्या जयघोषात पार पडलेली ही यात्रा भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.













