देवळी : देवळी येथे दिनांक 24 ला महाराष्ट्र केसरी महिला कुस्ती स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री श्री अशोक उईके, माजी खासदार रामदाजी तडस, देवळी पुलगाव विधानसभेचे आमदार राजेशजी बकाने, माजी खा. सुरेश वाघमारे, सुनील गफाट, माजी आ. दादाराव केचे , महाराष्ट्र कुस्ती संघाचे संदीपजी भोंडवे ,वैशालीताई येरावार , शोभाताई तडस, ड्रा नरेंद्र मदनकर उपस्थित होते.
महाराष्ट्र केसरी महिला कुस्ती स्पर्ध करिता महाराष्ट्र राज्या तून 42 संघ सहभागी झाले असून आज उद्घाटन सोहळा पार पडला
या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री श्री अशोक उईक यांनी आपल्या उद्घाटन पर भाषणात श्री रामदास तडस यांनी जागतिक स्तरावर कुस्ती च्या स्पर्धा आयोजित करण्या करिता जे स्टेडियम चे निर्माण देवली येथे केले पण जागतिक पातळीवरील स्पर्धा घेण्या करिता खेळाडूंन करिता वसतिगृह निर्माण करणे गरजेचे आहे वस्ती गृह निर्माण करण्या करिता महाराष्ट्र सरकार कडून प्रयत्न करण्याचे आश्वासन या वेळी केले.
या प्रसंगी माजी खासदार रामदास तडस व्हॉलीबॉल व कुस्ती अकॅडमी चे खेळाडू जांनी राज्य स्तरीय व्हॉलीबॉल मध्ये उत्कृष्ठ कामगिरी केली त्या मध्ये
सार्थक मलमे , अस्विता शास्त्रकार, सानवी साचेवार
यांचा मा मंत्री अशोक उईकें व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी उपस्थित पाहुण्याचे हस्ते महाराष्ट्र केसरी कुस्ती लावून स्पर्धेस सुरुवात करण्यात आली
या लढतीत भाग्यश्री फंड पुणे जिल्हा व सिद्धी होळकर पुणे शहर यांच्यात रोमांचक. सामना झाला व सिद्धी होळकर पुणे शहर या मल्ल विजयी झाल्या

हा रोमांचक सामना पाहण्या करिता आदिवासी विकास मंत्री श्री अशोक उईके, माजी खासदार रामदास तडस आमदार राजेश बकाने व इतर पदाधिकारी उपस्थित होते













