• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

यशोगाथा घडल्यावरही माता आणि मातीचा आदरभाव ठेवावा- सुहास वैद्य

सात्रळ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा उद्घाटन समारंभ

admin by admin
January 23, 2025
in ताज्या बातम्या, नाशिक, पुणे, प्रशासन, महाराष्ट्
Reading Time: 1 min read
A A
0
Spread the Information

सात्रळ, दि. २०: उडण्याची उमेद मनामध्ये लागते. ही ऊर्जा निर्माण करण्यासाठी झगडावे लागते. शैक्षणिक जीवनातील संधीचा फायदा घेऊन यशाचे शिखर गाठता आले पाहिजे. विद्यार्थ्यांनी सर्वांगीण प्रगती करण्याचे काम यापुढे करावयाचे आहे. नियमितता, सातत्यता आणि कार्यमग्नता ठेवल्यास जीवनात नक्कीच यश मिळते. विद्यार्थ्यांनी यशोगाथा घडल्यावरही माता आणि मातीचा आदरभाव ठेवला पाहिजे असे मत प्रतिपादन दैनिक सकाळ या वृत्तपत्राचे पत्रकार श्री. सुहास वैद्य यांनी केले.
प्रवरेच्या नदी काठावरील धानोरे घाटावर आयोजित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सात्रळ येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. ‘युथ फॉर माय भारत व युथ फॉर डिजिटल लिटरसी’ हे मध्यवर्ती आशयसूत्र घेऊन सदरचे विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित केल्याची माहिती स्वागत व प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. एस. एन. शिंगोटे यांनी दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक मा. श्री. ॲड. आप्पासाहेब कारभारी दिघे पाटील हे होते.
याप्रसंगी कारखान्याचे संचालक श्री. किरण सुधाकर दिघे, श्री. सुभाष नामदेव अंत्रे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. श्री. रमेश भिमराज पन्हाळे, प्रा. बाळासाहेब सर्जेराव दिघे, श्री. जयवंत पुंजाजी जोर्वेकर, श्री. किसन बाबाराव दिघे, धानोरे गावचे उपसरपंच श्री. ज्ञानदेव संतू दिघे, पांडुरंग त्रिंबक दिघे, रंगनाथ भिकाजी दिघे, राहुल चांगदेव दिघे, राहुल संपतराव दिघे, नंदू विठ्ठल दिघे, अंबादास त्रिंबक दिघे, सुभाष तुकाराम दिघे, यशवंत दिघे, ऋषिकेश दिघे, उपप्राचार्या डॉ. जयश्री सिनगर, उपप्राचार्य डॉ. दीपक घोलप, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. रोहिदास भडकवाड, डॉ. निलेश कान्हे, डॉ. विजय शिंदे, प्रा. संदिप राजभोज, प्रा. एस. पी. कडू, प्रा. सुधीर वाघे, स्वयंसेवक प्रतिनिधी कु. ईश्वरी बडोदे, कृष्णा शिंदे आदी उपस्थित होते.
तरुणाईला मार्गदर्शन करताना श्री. सुहास वैद्य पुढे म्हणाले, युवकांनी परीक्षार्थी न होता ज्ञानार्थी होऊन व्यापक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. देशाविषयीची रचनात्मक कार्यमग्नता महत्त्वाची आहे. शैक्षणिक वाटचालीत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ‘हम भी कुछ देना सीखे’ ही सक्षम भारत घडवणारी कविता सोदाहरण स्पष्ट करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. शिबिर काळात ग्रामस्वच्छता, नव-मतदार जनजागृती, वृक्षारोपण, डिजिटल लिटरसी, व्यक्तिमत्व विकास, व्याख्यानमाला, अक्षय ऊर्जा जनजागृती, समाजप्रबोधनपर पथनाट्य, शिवार फेरी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व, ग्रामस्थ भेट, बौद्धिक खेळ, अहवाल लेखन, आरोग्य व हिमोग्लोबिन तपासणी शिबिर इत्यादी उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
शिबिरात डॉ. भाऊसाहेब नवले यांनी ‘व्यक्तिमत्व विकास’ तर प्रवरा कमिटी रेडिओच्या सौ. गायत्री म्हस्के यांनी ‘संवाद कौशल्य’ या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ. भाऊसाहेब नवले यांनी केले. आभार उपप्राचार्या डॉ. जयश्री सिनगर यांनी मानले. कार्यक्रमास स्वयंसेवक विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.अशी “सह्याद्रीचा राखणदार “या दैनिक वृत्तपत्राचे वार्ताहर गणेश सोमवंशी यांनी या वेळी दिली.

RelatedPosts

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार; बोरी खुर्दच्या ग्रामस्थांचा संताप

श्रमदानातून अण्णाभाऊ साठे यांना कृतीशील अभिवादन

Previous Post

हदगाव एसबीआय बँकेचे शाखा अधिकारी प्रकाश मेका यांचे शेतकऱ्यांना थेट आवाहन – दलालांपासून सावध रहा

Next Post

सात्रळ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपान शिंगोटे यांना राष्ट्रीय स्तरावरचा आदर्श प्राचार्य पुरस्कार

admin

admin

Next Post

सात्रळ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपान शिंगोटे यांना राष्ट्रीय स्तरावरचा आदर्श प्राचार्य पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1