
शिर्डी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार तसेच राज्यसभेच्या खा.सौ सुनेत्रा पवार यांनी शिर्डी शहरातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रमेश गोंदकर पाटील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिपक गोंदकर यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वनपर भेट दिली.दरम्यान काही दिवसापूर्वी शिर्डी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते रमेश गोंदकर यांच्या मातोश्री स्वर्गीय इंदुबाई भाऊसाहेब गोंदकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे शिर्डी शहरात आयोजित दि. १८आणी १९ जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिरासाठी उपस्थित राहिले असता प्रथम त्यांनी श्री साईबाबा मंदिरात जाऊन साई समाधीचे मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद घेतले.तदनंतर त्यांनी रमेश गोंदकर यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबाची सांत्वन पर भेट घेतली. यावेळी खा. सुनेत्रा पवार आणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्व. इंदुबाई गोंदकर यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.यावेळी ना. अजितदादा यांनी स्व. इंदुबाई गोंदकर यांच्या प्रकृती आणी वयाबद्दल गोंदकर परिवाराशी विचारपूस केली. खरंतर कार्यकर्त्यांच्या सुख दुःखात नेहमीच अजितदादा यांचा आवर्जून सहभाग असतो. उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यावर त्यांनी शिर्डीत आल्यानंतर आपल्या कार्यकर्त्याच्या दुःखात सहभागी झाल्याचे चित्र आपल्याला पाहावयास मिळाले आहे.याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते रमेश गोंदकर त्यांचे बंधू माजी उपनगराध्य गोपीनाथ बापू गोंदकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दिपक गोंदकर, सौ आशा रमेश गोंदकर, लता गोपीनाथ गोंदकर, उज्वला किशोर गोंदकर, सौ प्रियंका दीपक गोंदकर, सौ पूजा योगेश्वर गोंदकर, योगेश्वर गोंदकर, प्रसाद गोंदकर, अभिजीत गोंदकर, कु प्रतीक्षा गोंदकर, कु ऋतुपर्ण गोंदकर, चि कृष्णा गोंदकर त्याचप्रमाणे परिवारातील सर्व कुटुंब उपस्थित होते












