गोंडपिपरी -(सुरज माडूरवार)
पायदळ जात असणाऱ्या इसमाला भरधाव जाणाऱ्या अज्ञात कारणे धडक दिल्याने इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि. (21 ) मंगळवारी रात्री आठ वाजता दरम्यान घडली आष्टी पुलाजवळ घडली.
संदीप देवान वय 50 श्रीनगर तालुका मुलचेरा जिल्हा गडचिरोली असे मृतकाचे नाव असून तो पायदळ आष्टी कडे जात होता.गोंडपिपरी मार्गे आष्टी कडे जाणाऱ्या भरधाव चारचाकी वाहनाने मागून धडक दिल्याने संदीप देवान याचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांना दिली घटनास्थळी ठाणेदार व गोंडपिपरी पोलीस पोहचून घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले.पुढील तपास गोंडपिंपरी पोलीस करीत आहे.













