गंगापूर प्रतिनिधी
पत्रकार आणि पोलीस हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. लोकशाही टिकवण्यासाठी पत्रकारांना पाठबळ दिल्यास समाजाचे कल्याण होईल, असे मत गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांनी व्यक्त केले.
गंगापूर पोलीस स्टेशनच्या वतीने लोकशाही पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक राठोड म्हणाले, “पत्रकार आणि पोलीस यांची भूमिका समाजासाठी महत्त्वाची आहे. समाजबदलाचे खरे पाईक असलेले पत्रकार आणि गुन्हेगारीला आळा घालून न्याय मिळवून देणारे पोलीस अधिकारी यांचे दुःखही सारखेच आहे. सामाजिक बदलासाठी आणि चांगल्या कामांसाठी पोलीस प्रशासन नेहमीच पत्रकारांना पाठबळ देईल.”
कार्यक्रमात तालुकाध्यक्ष अमीन पटेल, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर अमृते, तालुका सचिव गोकुळ लांडे, प्रकाश साळुंखे, प्रताप साळुंखे, अन्वर बागवान, जयेश निरफळ, रामेश्वर अमृते, धनंजय ठोंबरे, गुलाब वाघ, खलील पटेल, अमोल शिंदे, सोमनाथ शिंदे, राजू जाधव, सुनील झिजूर्डे, नारायण पठाडे, फेरोज मन्सूरी, सलीम सय्यद, गणेश म्हैसमाळे आदींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार गुलाब वाघ यांनी केले, तर आभार संदीप राठोड यांनी मानले.













