• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home महाराष्ट्

किन्हवलीचा सरकारी दवाखाना अनधिकृत पार्किंगच्या गाड्यामुळे विळख्यात

Ashish Ghume by Ashish Ghume
January 13, 2025
in महाराष्ट्
Reading Time: 1 min read
A A
0
किन्हवलीचा सरकारी दवाखाना अनधिकृत पार्किंगच्या गाड्यामुळे विळख्यात
Spread the Information

ठाणे: प्रतिनिधी रविंद्र धारवणे

RelatedPosts

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार; बोरी खुर्दच्या ग्रामस्थांचा संताप

श्रमदानातून अण्णाभाऊ साठे यांना कृतीशील अभिवादन

शहापूर तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्राला अनधिकृत पार्किंगचे ग्रहण लागले आहे. या दवाखान्याच्या प्रवेशद्वारात आणि कुंपणाच्या आतील मोकळ्या जागेत खाजगी वाहने अशा पद्धतीने लावली जात आहेत की रुग्णवाहिका यायलाही जागा राहत नसल्याने अत्यवस्थ रुग्णांची हेळसांड होत आहे. या अतिक्रमणामुळे हैराण झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शहापूर पंचायत समितीच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र लिहून कैफियत मांडली आहे.

किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्र सुमारे २६,०८७ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहे. गोरगरीबांसाठी मोफत आणि चांगली आरोग्यसेवा देणारा हा दवाखाना, नव्याने बांधलेल्या सुसज्ज इमारतीत सुरू झाल्यावरच अनधिकृत पार्किंगच्या समस्येचा सामना करीत आहे.

या दवाखान्यात दररोज सरासरी १५० रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येत असतात, त्यात काही अत्यवस्थ रुग्णांचा समावेश आहे. मात्र, आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारात खाजगी वाहतूक करणारी वाहने उभी राहत असल्याने रुग्ण वाहून आणणारे वाहन किंवा रुग्णवाहिका प्रवेशद्वारातून आत जायलाही जागा नसते.

सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण भेरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ नोव्हेंबर रोजी कानवे गावातील एका अत्यवस्थ रुग्णाला खाजगी वाहनातून किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन आले असता, दवाखान्याच्या आवारात वाहन उभे करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने रुग्णाला उचलून नेण्यात आले.

दवाखान्याच्या कुंपणाच्या आतील जागेत खाजगी दुचाकी व चारचाकी वाहने नियमितपणे उभी असतात. भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईकडे कामावर जाणारे अनेकजण १० ते १२ तासांसाठी येथे वाहने पार्क करून जातात, काही वाहने महिन्याभरासाठी उभी ठेवली जात आहेत.

या परिस्थितीमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या वाहने लावायला जागा नसते, रुग्णवाहिका व इतर वाहनांसाठी प्रवेशद्वारातून जागा नसते, आणि कुंपणाच्या आत वाहनांची गर्दी होऊन अडथळे निर्माण होत आहेत. याबाबत रुग्ण कल्याण समितीने ठराव करून किन्हवली पोलिसांना कारवाईसाठी पत्र दिले होते. मात्र पोलिसांनी एकदा कारवाई केली असली तरी परिस्थिती पुन्हा जसाच्या तशी असल्याने, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शहापूर पंचायत समितीच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र लिहून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.

यामुळे किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनधिकृत पार्किंगचा विषय ऐरणीवर आला असून, प्रशासन याबाबत काय कारवाई करते याकडे आरोग्य कर्मचारी व रुग्णांचे डोळे लागले आहेत.

“दवाखान्याच्या मालकीच्या जागेत इतकी वाहने अनधिकृतपणे पार्क केली जातात की आमच्या कर्मचारी व रुग्णांना वाहन कुठे लावावे असा प्रश्न पडतो. रुग्णवाहिका फिरवण्यात अडथळा येतो. यावर उपाययोजना व्हावी यासाठी आम्ही तालुका वैद्यकीय अधिकारी यांना पत्र दिले आहे.”
— डॉ. जागृती खादे, वैद्यकीय अधिकारी, प्रा. आ. केंद्र किन्हवली

“रुग्णांना रुग्णालयात जाताना वाहनांच्या विळख्यातून वाट काढत जावे लागत असेल, तर हा सरकारी दवाखाना म्हणावा की वाहनतळ असा प्रश्न पडतोय. या विषयावर मी लवकरच जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट घेणार आहे.”
— बाळकृष्ण बोबा भेरे, सामाजिक कार्यकर्ते, कानवे

Previous Post

“संजीवनी”ला एज्युकेशन एक्सलन्स पुरस्कार

Next Post

अल्पवयीन बालीकेवर ४० वर्षिय युवकाचा अत्याचार

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
अल्पवयीन बालीकेवर ४० वर्षिय युवकाचा अत्याचार

अल्पवयीन बालीकेवर ४० वर्षिय युवकाचा अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1