चिमूर प्रतिनिधी शेषराव राऊत
तालुक्यातील भिसी येथे ४० वर्षे वयाच्या युवकाने एका अल्पवयीन बालीकेला चाकलेट चे आमीष दाखवून अत्याचार केल्याची घटना रविवार ला अंदाजे तीन वाजताचे सुमारास घडली. पिढीत बालीकेच्या आईने दिलेल्या तक़ारी वरून पोलीस स्टेशन भिसी येथे पोक्सो कायद्याअंतर्गत अन्य कलमासह गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.
प़ाप्त माहीती नुसार आज रविवार ला दुपारी तीन वाजताचे सुमारास आरोपी अरविंद हरिदास नगरारे वय अंदाजे ४० वर्षे राहणार भिसी या युवकाने एका अल्पवयीन बालीका आपल्या समवयस्क बालकांसोबत घराजवळ खेळत असतांना आरोपी ने बालीकेसोबत खेळत असलेल्या बालकांना खाऊसाठी पैसे दिले व त्यांना दुकानात पाठवून दिले त्यानंतर आरोपी ने पिढीत बालीकेला चाकलेट चे आमीष दाखवून एका पडक्या घराच्या आत मध्ये नेऊन अत्याचार केल्याची घटना अंदाजे तीन वाजताचे सुमारास घडली. पिढीत बालीकेच्या आईने दिलेल्या तक़ारी वरून पोलीस स्टेशन भिसी येथे आरोपी अरविंद हरिदास नगरारे वय ४० वर्षे यांचे विरूद्ध कलम ६४,६४ (२) (आय), ६४(२), (जे) बाल अत्याचार प़तिबंधक अधिनियम- सहकलम ४,८ पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करून आरोपी ला अटक करण्यात आलेली आहे.
पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी चिमूर यांचे मार्गदर्शनानुसार पोलीस स्टेशन भिसी चे ठाणेदार जितेंद्र चांदे तसेच पोलीस निरीक्षक वाघ हे करित आहेत.












