
महाराष्ट्र शासकीय रेखाकला परीक्षा २०२४ चा निकाल शुक्रवार दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. सदर परीक्षेमध्ये विद्या विकास पब्लिक स्कुल बाभळेश्वर या विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला.
सदर परीक्षेमध्ये विद्यालयातील एकूण ३० विद्यार्थी सहभागी झालेले होते. परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी A ग्रेडमध्ये एकूण १ विद्यार्थी, B ग्रेडमध्ये एकूण ८ विद्यार्थी,
C ग्रेडमध्ये एकूण २१ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
सदर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कलाध्यापक श्रीमती सोमवंशी मॅडम यांनी केले. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक कलाध्यापक यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री नालकर आर.बी., श्री गमे जी . टी., कांदाळकर डी. बी.यांनी अभिनंदन केले.संस्थेचे अध्यक्ष श्री रावसाहेब म्हस्के पाटील सचिव श्रीअण्णासाहेब म्हस्के पाटील , उपाध्यक्ष श्री ज्ञानदेव म्हस्के पाटील तसेच शालेय समितीचे सदस्य तसेच संस्थेचे संचालक मंडळ व सर्व पदाधिकारी यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.











