
शिरूर महाराष्ट्र शासकीय रेखाकला परीक्षा २०२४ चा निकाल शुक्रवार दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. सदर परीक्षेमध्ये विद्याधाम प्रशाला शिरूरचा निकाल १०० टक्के लागला.
सदर परीक्षेमध्ये प्रशालेतील एकूण १०६ विद्यार्थी सहभागी झालेले होते. परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी A ग्रेडमध्ये एकूण ११ विद्यार्थी, B ग्रेडमध्ये एकूण ३७ विद्यार्थी,
C ग्रेडमध्ये एकूण ५८ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
सदर विद्यार्थ्यांना मार्गदर्शक कलाध्यापक सूर्यवंशी आर.पी. हिवरकर एन.के. देवकर पी.बी. यांनी केले. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक कलाध्यापक यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक मा. पाचर्णे जी.ए., पर्यवेक्षक नाईक डी.एस. देवीकर सी.बी.बनकर एम.पी. यांनी अभिनंदन केले.
संस्थेचे अध्यक्ष अनिल बोरा, सचिव नंदकुमार निकम, शालेय समितीचे अध्यक्ष धरमचंदजी फुलफगर व सर्व पदाधिकारी यांनीही अभिनंदन केले.











