भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले होते. त्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी २५ डिसेंबर हा दिवस मनुस्मृती दहन दिन म्हणून साजरा केला जातो.
याच परंपरेनुसार, गंगाखेड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर बुधवार, २५ डिसेंबर रोजी आंबेडकरी अनुयायांच्या वतीने मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांनी सामाजिक समतेचा संदेश देत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमास महावीर घोबाळे, विकास रोडे, मनोहर वावळे, संतोष हनवते, अशोक वावळे, भीमराव कांबळे, बाळासाहेब जंगले, शिवराज पैठणे, गोविंद नरवड, गुणवंत कांबळे, व्यंकटेश मोरे, वसंत गेजगे, रोहिदास लांडगे, हनुमान भालेकर, नागेश डमरे, नवनाथ साळवे, गजानन पारवे आदी आंबेडकरी अनुयायांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमातून सामाजिक न्याय आणि समतेचा संदेश देत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे अनुकरण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.













