राजुरा, 25 डिसेंबर:
भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न श्रद्धेय स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त राजुरा येथील भाजपा विधानसभा जनसंपर्क कार्यालयात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आमदार देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
अटलजींच्या दूरदृष्टीने विकसीत भारताच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले. भारतीय लोकशाहीला नवी दिशा देणाऱ्या त्यांच्या विचारांनी आणि कार्यांनी आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात स्थान मिळवले आहे. या कार्यक्रमात आमदार भोंगळे यांनी वाजपेयी यांची जीवनकथा उलगडत त्यांचा सौम्य दृष्टिकोन, प्रभावी नेतृत्व आणि सर्वसमावेशक कार्य यांची महत्ता स्पष्ट केली.
याच वेळी गोंडपिपरी तालुकाध्यक्ष दीपक सातपुते यांचा वाढदिवस कार्यालयाच्या वतीने साजरा करण्यात आला. याप्रसंगी तालुका उपाध्यक्ष सतिश कोमरवेल्लीवार, गडचांदूर शहराध्यक्ष अरुण डोहे, गोंडपिपरी भाजयुमो तालुकाध्यक्ष राकेश पुन यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यालयातील सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
अटलजींच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा विकसित भारतासाठी सदैव मार्गदर्शन करीत राहील. सुशासन दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा
*आमदार देवराव भोंगळे यांचा संदेश*













