राज्य शासनाने वर्धा जिल्ह्यातील नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमती वानमती सी. यांची नियुक्ती केली आहे. त्या यापूर्वी राज्य कर विभागात सह आयुक्त म्हणून कार्यरत होत्या.
वर्धा जिल्हाधिकारीपदावरील विद्यमान अधिकारी राहुल कर्डिले यांची बदली नाशिक महानगरपालिका आयुक्तपदी करण्यात आली आहे. वानमती सी. यांचा प्रशासनातील अनुभव जिल्ह्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.













