इंदापूर प्रतिनिधी – दत्तात्रय गवळी
इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक येथे मुख्याध्यापक राजेंद्र सोनवणे यांच्या घराजवळ उभी असलेल्या त्यांच्या नवीन व्हॅगनार गाडी (MH 42 BE 7936) ची तोडफोड करण्यात आली. ही घटना सोमवारी, 23 डिसेंबर रोजी सायंकाळी 8 ते 9 वाजताच्या दरम्यान घडली.
सदर गाडीची पाठीमागील काच फोडण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून संबंधित शिक्षक व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेची तक्रार इंदापूर पोलीस स्टेशन येथे नोंदवण्यात आली आहे. पोलीस हवालदार केमदार साहेब व त्यांच्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली असून दोषींना लवकरच शोधून काढण्याचे आश्वासन दिले आहे.
तोडफोडीच्या कारणांचा अद्याप खुलासा झालेला नसून पोलिसांचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.













