
कोल्हार : श्री नवनाथ कथाकार हरेशजीं गिरी महाराज यांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथील निर्गुण मठात अभिषेक करून नंतर कडगंजी येथील सायन देव मंदिर तसेच श्रीक्षेत्र अक्कलकोट व श्री क्षेत्र पंढरपूर येथे भेट देऊन आणलेल्या श्री दत्त पादुकांचे कोल्हार येथे स्वागत करण्यात आले कोल्हार येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ.रमेश वाव्हळ यांच्या निवासस्थानी श्री दत्त पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील श्री विजय डोखळे व ॲड. राजेंद्र डोखळे यांच्या वस्तीवरील श्री दत्त मंदिरात या पादुकांचे विधिवत पूजन करून स्थापित करण्यात येणार आहे. श्री गुरुदेव दत्त जयंतीउत्सव निमित्त दररोज सायंकाळी ७ ते १० या वेळेत श्री नवनाथ कथाकार श्री हरेशजी गिरी महाराज यांची संगीतमय नवनाथ कथा पार पडणार आहे अशी माहिती राजेंद्र डोखळे यांनी दिली यावेळी श्री वाव्हळ परिवारासह भाविकांनी पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेतला,

याप्रसंगी वाव्हळ परिवारातील सदस्यांनी श्री हरीश जी गिरी महाराजांसह ॲड. राजेंद्र डोखळे, विजय डोखळे, कुसुमअक्का ताई डोखळे तसेच मधुरा सचिन डोखळे यांचा सत्कार केला.याप्रसंगी डॉ. वाव्हळ, शोभा वाव्हळ, डॉ. विशाल वाव्हळ, पुजा वाव्हळ, विजय डेंगळे, पांडुरंग जोशी, आरती जोशी पत्रकार प्रमोद जी कुंभकर्ण, सह्याद्री राखणदार या दैनिकाचे चे वार्ताहार गणेश सोमवंशी उपस्थित होते











