
पारनेर : पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार आमदार काशिनाथजी दाते सर यांचा शपथ विधी झाल्यानंतर कामोठे इथे आज यांचे भव्य स्वागत व पेढे तुला करण्यात आली .


यावेळी मा. सरपंच संतोष दादा मोरे आणि मोरे पाटील परीवाराकडून तसेच नातेवाईकांनी व पारनेरकर रहिवासी असलेल्या ग्रामस्थांकडून आमदार साहेबांचा सत्कार कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडलायावेळी मोठ्या संख्येने पारनेरकर रहिवासी असलेले व सध्या कामोठे नवी मुंबई येथे रहात असलेले ग्रामस्थ उपस्थित होते
या कार्यक्रमाचे आयोजन पारनेरकर रहिवासी मित्र मंडळ कामोठे, नवी मुंबई यांनी केले











