
पाथर्डी : पाथर्डी नगरपरिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी नगरपरिषद अधिकारी संतोष लांडगे साहेब यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमात नगरपालिकेचे कर्मचारी मदने सर, अंबादास साठे सर, शंकर मर्दाने सर, संजय खोर्दे सर, डोमकावळे सर, सोनटक्के सर, आणि अमित वैद्य यांनी देखील सहभाग घेतला. या कार्यक्रमाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक, शैक्षणिक, आणि राजकीय कार्य स्मरणात ठेवून त्यांच्या विचारांचा आदर करण्यात आला.
हा उपक्रम पाथर्डी नगरपरिषदेच्या वतीने त्यांच्या आदर्शांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.











