पुलगाव -भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न प.पू.डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा एवढा घोर अपमान आजपर्यंत कोणीही जाहीररित्या केला नसेल,एवढा घोर अपमान दि.२९ मे ला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कांग्रेसच्या एका निर्लज्ज नेत्यानी केलेला आहे.
थेट बाबासाहेबांचा फोटो फाडून फेकण्याची हिम्मत करणाऱ्या राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा हलकट प्रवृत्तीच्या जितेंद्र आव्हाड यांचा “जोडे मारा “आंदोलनात भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष संजय गाते यांनी जाहीर निषेध व्यक्त करुन जितेंद्र आव्हाड यांचा कर्ता करविता असलेले शरद पवार यांनी सुद्धा जाहीर माफी मागावी व जितेंद्र आव्हाड यांचेवर गुन्हा दाखल करुन अटक करावी, अशी मागणी यावेळी केली.दि.३० मे ला सकाळी १० वाजता पनिषेधार्थ भारतीय जनता पार्टी पुलगाव शहर व नाचणगाव-गुंजखेडा मंडलाच्या वतीने जोरदार निषेधार्थ घोषणाबाजी करुन“ जोडे मारा आंदोलन” स्थानीय डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर करण्यात आले. यावेळी भाजपा पुलगाव शहर अध्यक्ष नितीन बडगे, नाचणगाव- गुंजखेडा मंडल अध्यक्ष ओंकार राऊत, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश सचिव शकील खान,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मधुकरराव रेवतकर,भाजपा जिल्हा सचिव श्र किशोर गव्हाळकर, भाजपा महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौ माधुरी इंगळे,भाजयुमो जिल्हा सरचिटणीस संतोष तिवारी,भाजपा शहर सरचिटणीस रिचर्ड क्रॉस, राजकुमार पनपालिया, मनोज वालदे, शहर उपाध्यक्ष चंद्रकांत शहाकार, विशाल धोपाडे, गजेंद्र चंदेल,नाचणगाव- गुंजखेडा मंडल सरचिटणीस प्रवीण नांदे, सचिन कासार, भाजयुमो पुलगाव शहर अध्यक्ष अली असगर सैफी, महामंत्री ज्ञानेश्वर कुंभारे,ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संदीप बोरकुटे,शहर अध्यक्ष अनिल लेकुरवाळे,भाजयुमो नाचणगाव मंडल अध्यक्ष बजरंग रावेकर,युवामोर्चा जिल्हा सचिव राहुल गायकवाड ,प्रफुल मंथनवार, सौ सोनल दुबे,प्रविण कपाट,महेश मार्कंड,नरेंद्र मानकर सह मोठ्या संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.