• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home नागपूर

रस्त्यावर तडफडणाऱ्या महिलेला मिळाला मदतीचा हात; आमदार अडबाले ठरले आधार

नागपूर-काटोल मार्गावरील अपघातानंतर दाखवली तत्परता; स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात पोहोचवत दिला दिलासा

Ashish Ghume by Ashish Ghume
June 7, 2026
in नागपूर
Reading Time: 1 min read
A A
0
नागपूर-काटोल मार्गावरील अपघातानंतर दाखवली तत्परता; स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात पोहोचवत दिला दिलासा
Spread the Information

नागपूर (वैभव शहाणे ) : लोकप्रतिनिधी हा केवळ विकासकामांचा शिल्पकार नसून संकटाच्या काळात जनतेच्या मदतीला धावून जाणारा आधारवडही असतो, याचा प्रत्यय रविवार (दि. ७ जून) रोजी आला. नागपूरहून काटोलकडे दौऱ्यावर जात असताना मार्गात झालेल्या अपघातातील जखमी महिलेच्या मदतीसाठी आमदार सुधाकर अडबाले यांनी दाखविलेली तत्परता आणि संवेदनशीलता नागरिकांच्या कौतुकाचा विषय ठरली.

RelatedPosts

टेबूरडोह येथे ३७ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट

नागपूर शहर पोलिसांतर्गत ‘ऑपरेशन यू-टर्न’ (Operation U-Turn) अंतर्गत अमली पदार्थ चाचणी उपक्रमाचा शुभारंभ; बेदरकार ड्रायव्हिंगला आळा घालण्यासाठी पाऊल

कॅनॉलमध्ये आढळला व्यक्तीचा मृतदेह; मृतकाची ओळख पटली

नागपूर-काटोल मार्गावर एका दुर्दैवी अपघातात सौ. वनिता कुणाल मोहरिया या जखमी झाल्याचे आमदार अडबाले यांच्या निदर्शनास आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपला ताफा थांबवून घटनास्थळी धाव घेतली. जखमी महिलेची प्रकृती पाहून तिला तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला.

रुग्णवाहिकेची वाट पाहण्यात वेळ न घालवता आमदार अडबाले यांनी जखमी महिलेला स्वतःच्या वाहनातून काटोल येथील रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश खोब्रागडे यांच्याशी संपर्क साधून तात्काळ उपचार सुरू करण्याच्या सूचना दिल्या. प्राथमिक उपचारानंतर अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधांसाठी संबंधित महिलेला नागपूर येथे रेफर करण्यात आले.

अपघाताच्या प्रसंगी अनेकजण केवळ बघ्याची भूमिका घेत असताना आमदार अडबाले यांनी दाखविलेली संवेदनशीलता आणि तत्परता ही खऱ्या अर्थाने लोकसेवेची भावना अधोरेखित करणारी ठरली. त्यांच्या या कृतीमुळे जखमी महिलेला वेळेत उपचार मिळाले असून तिच्या कुटुंबीयांनाही मोठा दिलासा मिळाला.

सामान्य नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, संकटसमयी मदतीचा हात पुढे करणे आणि प्रशासनाला तत्काळ कामाला लावणे, ही लोकप्रतिनिधीची खरी ओळख असल्याचे आमदार अडबाले यांनी आपल्या कृतीतून पुन्हा एकदा सिद्ध केले. त्यांच्या या मानवतावादी भूमिकेचे परिसरातील नागरिकांकडून तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक करण्यात येत आहे.

यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नागपूर जिल्हा कार्यवाह संजय वारकर तसेच नीलेश खोरगडे उपस्थित होते.

कृतीतून जपली लोकसेवेची परंपरा

अपघातग्रस्त व्यक्तीला वेळेत उपचार मिळणे हे जीव वाचविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. आमदार सुधाकर अडबाले यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे जखमी महिलेला त्वरित उपचार मिळाले. संकटाच्या प्रसंगी धावून जाणारी ही भूमिका लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या संवेदनशील कार्यपद्धतीची साक्ष देणारी ठरली.

Previous Post

नागरिकांपर्यंत स्वतः पोहोचून योजनांचा लाभ द्या आणि प्रक्रिया सुलभ करा : मुख्य सचिव राजेश अग्रवाल

Next Post

टेबूरडोह येथे ३७ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
टेबूरडोह येथे ३७ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट

टेबूरडोह येथे ३७ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1