सावनेर:- तालुक्यातील टेबूरडोह येथे एका ३७ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
मृतकाचे नाव दादाराव मधुकरजी रंगारी (वय ३७ वर्षे, रा. टेबूरडोह, ता. सावनेर, जि. नागपूर) असे आहे. ही घटना खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून आवश्यक कायदेशीर कार्यवाही केली. सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी याबाबत खापा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर भुजाडे यांना माहिती दिली.
मृतदेह पुढील तपासणीसाठी सावनेर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. खापा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.













