गोंडपिपरी – (सुरज माडूरवार)
स्वामित्व योजनेअंतर्गत भूमिअभिलेख कार्यालयामार्फत नागपूर विभागात उल्लेखनीय काम करत गोंडपिपरी तालुक्याने बहुमान पटकावला. उपअधीक्षक अरुण वऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनात सातत्यपूर्ण पाठपुरावानंतर तालुक्यातील कोरंबी ग्रामपंचायतने वर्षानु वर्ष रखडलेल्या जमिनीचा प्रश्न ड्रोन सर्वेक्षणातून निकाली काढला. एक-दोन नव्हे तर तब्बल ९१ कुटुंबांना आता जागेची कायम मालकी बहाल होणार असून पिढ्यानपिढ्यापासुनच्या त्यांचा प्रश्न भूअभिलेख विभाग आणि कोरंबी ग्रामपंचायतीमार्फत सनद मिळाल्यानंतर सुटनार आहे.आतापर्यंत ४० जणांना मालकी हक्क बहाल करण्यात आले. गावचा शिवार सुजलाम सुफलाम व समृध्द व्हावा यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश बारसागडे, ग्रामसेवक देवराव कोडापे यांच्या मार्गदर्शनात उपसरपंच मिना शेंडे,सदस्य सोनी दिवसे,नितेश मेश्राम,श्रावण शेंडे यांच्याकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.ग्रामपंचायती अंतर्गत ४० कुटुंबियांना नुकतेच त्यांच्या जमिनीची सनद मिळाली आहे.तसा हा आकडा ९१ असून त्याचे वितरण लवकरच होईल,असे सदस्य नितीन मेश्राम यांनी सांगितले.गावातील लोकांना अतिक्रमणामुळे शासकीय योजनांचा लाभ मिळत नव्हता.राहती जागा बिनकामाची होती.पिढ्यानपिढ्या पासून जागेचा सांभाळ करून देखील त्यावर ना कर्ज मिळाले,नाही जागेचा रेकॉर्ड बनला.अशावेळी बहुप्रतिक्षेनंतर अचानक लोकांना त्यांचा हक्क प्राप्त झाला आहे.दरम्यान जमिनीच्या सनद वाटपाचा कार्यक्रम चेकविठ्ठलवाडा गावात पार पडला.यावेळी भूमापक तुषांत तागडे,विनोद चिताडे,माजी सरपंच भाऊजी चनेकार यांच्यासह गावकरी उपस्थित होते.
“कोरंबी ग्रामपंचायतीची विकासाकडे वाटचाल सुरू आहे.रोहयो अंतर्गत कामात त्यांनी आघाडी घेतली आहे” नितेश दुर्योधन कार्यक्रम अधिकारी,रोहयो,गोंडपिपरी