लोकसभा निवडणुकीत सामाजिक संस्थांचा ना. सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर पाठींबा
चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या विकासासाठी भाजप महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार हेच सक्षम उमेदवार आहेत. त्यांच्या कार्यक्षमतेवर आम्हाला पूर्णपणे विश्वास असून येत्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त करीत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्था व संघटनांनी त्यांना जाहीर समर्थन देत पाठींबा दिला आहे.
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई (आठवले गट), पिरीपा (कवाडे गट), रासप मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या विजयासाठी तळागातील अनेक मान्यवर, प्रतिष्ठित व्यक्ती, सामाजिक संस्था व संघटना स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत आहेत . रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्था व संघटना सुधीर भाऊंना भेटून ‘माझं मत देशाला, माझं मत विकासाला’, असे म्हणत पाठींबा देण्यासाठी गर्दी करतात आहेत. अवघ्या दोन दिवसांवर येथून ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीत आमच्या सुधीर भाऊंचा विजय होऊ दे अशी प्रार्थना नागरिक करू लागले आहे. यामध्ये महाराष्ट्र इंजिनिअर्स असोशियनचे प्रदेश अध्यक्ष संजय शिंदे, महासचिव संतोष पारगावकर, ज्ञानेश्वर मुकादम, निसर्गराज सोनवणे, अमोल ऐंचवार, सुभाष कासनगोट्टूवार, लीलाधर भराकर, राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टीचे विदर्भ प्रदेश महासचिव सलीम काजी, जिल्हाध्यक्ष संदिप कोतंमवार, जिल्हा महानगर कॅटरिंग वेलफेअर असोशिएशन चंद्रपूरचे अध्यक्ष पंकज गुब्बावार, सचिव संदीप शेगमवार, प्रश्नात उंदीरवाडे, स्वराज्य प्रतिष्ठान हिंदुस्थान चंद्रपूरचे जिल्हाप्रमुख निशिकांत आष्टणकर, अखिल विमुक्त जाती व भटक्या जमाती परिषदेचे एड. पराग कहाळे, क्षत्रिय पोवार राजा भोज सेवा बहुउद्देशीय मंडळ दुर्गापूरचे अध्यक्ष महेंद्र राहांगडाले सचिव लेखलाल बिसेन, केवट समाज बहुउद्देशीय संस्था बल्लारपूरचे अध्यक्ष ओमप्रकाश निषाद, फुलचंद केवट, फुलचंद केवट, रमेश निषाद, चंद्रपूर भावसार क्षत्रिय समाज पंचकमीतीचे अध्यक्ष सूचक दखणे, महेंद्र जोगी, अनुप कुमार जवादे आदींनी बिनशर्त आपला पाठींबा दिला असून जाहीर समर्थन दिले आहे.
बेरोजगार अभियंत्यांना मिळाला न्याय
महाराष्ट्रात बेरोजगार अभियंत्यांचे अनेक प्रश्न शासन स्तरावर प्रलंबित होते. आमच्या शिष्टमंडळाने सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन अडचणी आणि समस्या सांगितल्या. त्यांनी आम्हाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. आणि काही महिन्यातच बेरोजगार अभियंत्यांचे अनेक प्रश्न शासन स्तरावर पाठपुरावा करून अभियंत्यांच्या रोजगाराभिमुख शासकीय अध्यादेश काढला. आमचे प्रश्न सोडविण्यात सुधीर भाऊंचा वाटा मोलाचा आहे. त्यामुळे महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशन त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत असे प्रदेश अध्यक्ष इंजिनिअर संजय शिंदे यांनी सांगितले.