वरोरा : तालुक्यातील जळका येथील रहिवाशी शेतकरी नंदकिशोर भालचंद्र गारघाटे काही दिवसांपूर्वी यांच्या गोठ्याला काही दिवसांपूर्वी अचानक आग लागली त्यात बैलांसह सर्व साहित्य जळून खाक झाले होते .कृषी उत्पन्न बाजार समिती द्वारे नैसर्गिक अपघातात मृत्यू झाल्यास आर्थिक मदत करण्यात येते .त्यानुसार त्यांना आर्थिक मदत करण्यात आली पण या आगीत शेतकऱ्याचे कृषी साहित्य व बैलबंडी जळून खाक झाल्याने . बळीराजाप्रती कृतज्ञता व्यक्त करत . १५ फेब्रुवारीला या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला कृषी उत्पन्न बाजार समिती द्वारे लोखंडी बैलबंडी देण्यात आली .
सभापती राजेंद्र चिकटे यांच्या हस्ते बैलबंडी शेतकऱ्याला सुपूर्द करण्यात आली. यावेळी बाजार समितीचे सचिव चंद्रसेन शिंदे, सहा. सचिव सचिन डहाळकर ,निरीक्षक श कन्हैया वरुटकर इतर कर्मचारी व बाजार समितीचे अडते व्यापारी मापारी उपस्थित होते.













