• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

लोकमान्य प्राथमिक विद्यालयात ऑटोचालकांसोबत रक्षाबंधन उत्साहात

Ashish Ghume by Ashish Ghume
September 1, 2026
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के
Spread the Information

वरोरा : विद्यार्थ्यांनी आयुष्यात चांगल्या गोष्टींची साथ धरावी. कोणी चुकीच्या अथवा वाईट कृत्याकडे प्रवृत्त करत असेल, तर त्याला स्पष्टपणे ‘नाही’ म्हणण्याचे धैर्य ठेवावे. त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःच्या सुरक्षिततेबाबत जागरूक राहून स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावावी, असे प्रतिपादन वरोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांनी केले.
स्थानिक लोकमान्य प्राथमिक विद्यालयात मंगळवार, १ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांनी त्यांना शाळेत ने-आण करणाऱ्या ऑटोचालकांसोबत रक्षाबंधनाचा उत्सव उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के उपस्थित होते.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सोनटक्के यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. चांगल्या सवयी, योग्य संगत आणि स्वतःच्या सुरक्षिततेबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत गुड टच-बॅड टच अर्थात चांगला व वाईट स्पर्श याबाबतही आवश्यक माहिती देत स्वतःच्या संरक्षणासाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील होते. प्रमुख उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक उमेश लाभे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आशिष घुमे, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष नंदकिशोर खिरटकर, वरोरा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार नितीन भगत तसेच ऑटोचालकांचे प्रतिनिधी विनोद खापणे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविकातून मुख्याध्यापक उमेश लाभे यांनी रक्षाबंधन कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर विद्यार्थिनींनी त्यांना दररोज शाळेत सुरक्षितपणे ने-आण करणाऱ्या ऑटोचालकांसह उपस्थित मान्यवरांना राखी बांधून स्नेहबंध दृढ केला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आशिष घुमे यांनी मनोगत व्यक्त केले. ऑटोचालकांचे प्रतिनिधी विनोद खापणे तसेच पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष नंदकिशोर खिरटकर यांनीही आपले विचार व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. श्रीकांत पाटील यांनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, संस्कार आणि सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणारे असे उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक शिक्षिका रजनी गोंडे यांनी केले, तर ज्येष्ठ शिक्षक रामभाऊ घोरुडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहायक शिक्षक कृपाल बालपांडे, शाळेचे लिपिक सुरेश बरडे, शिपाई अनंता आमटे, मानसेवी शिक्षिका दिशा कन्नोजवार आणि उज्वला गुरनुले यांनी परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमात विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटी ऑटोचालकांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

RelatedPosts

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष उपस्थितीत मूल शहरात स्वातंत्र्यदिनी सायंकाळी ४ वाजता भव्य तिरंगा यात्रा

Previous Post

स्मार्ट मीटरविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अल्टिमेटम;सात दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा

Ashish Ghume

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

September 1, 2026
स्मार्ट मीटरविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अल्टिमेटम;सात दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा

स्मार्ट मीटरविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अल्टिमेटम;सात दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा

September 1, 2026
‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

September 1, 2026
गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

August 31, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1