वरोरा (चंद्रपूर) :- वरोरा नगरपरिषद क्षेत्रातील जिजामाता वार्ड,राजीव गांधी वार्ड, सहारा पार्क, वांढरे लेआऊट मधील पिण्याच्या पाण्या करीता राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तर्फे १५ फेब्रुवारीला नगर परिषद मुख्याधिकारी यांना मागणीचे निवेदन देण्यात आले . निवेदनाला प्रतिसाद देत येत्या काही दिवसातच नवीन पाईप लाईन टाकून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येईल असा शब्द मुख्याधिकारी गजानन भोयर यांनी निवेदनकर्त्यांना दिला .
वरोरा नगरपालिका क्षेत्रातील जिजामाता प्रभाग,बावणे लेआऊट मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी वार्डातील जनता त्रस्त झालेली आहे. वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली नाही. त्यामुळे मोनाली संतोष काकडे यांनी सहारा पार्कच्या ओपन स्पेस मध्ये लोकांना एकत्रित करून बैठक घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत. १५ फेब्रुवारी रोज मंगळवारला वार्डातील नागरिकांना सोबत घेवून माजी विधानसभा उपाध्यक्ष ॲड. मोरेश्वर टेमुर्ड नेतृत्वात वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष विलास नेरकर, बंडू डाखरे,राजेंद्र वरघणे, बंडू भोंगाडे,रंजना पारशिवें यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी यांचे कार्यालय गाठून निवेदन देत जनतेला पिण्याचा पाण्यासाठी होत असलेल्या समस्येसह विविध समस्यांचा पाढा मुख्याधिकारी यांच्या समोर मांडताच मुख्याधिकारी यांनी निवेदनकर्त्यांशी चर्चा करून लवकरच संबंधित प्रभागात पिण्याच्या पाण्यासाठी नवीन पाईप लाईन टाकल्या जाईल असा शब्द दिला . यावेळी वार्डातील वनमाला कोहपरे,नीता बोधाने, पूनम हाते, मंगला मडावी,नंदा करमरकर,प्रेमीला चौधरी,माधुरी उसेवार सुभाष तोडकर,दादा क्षीरसागर,गोविदराव ठेंगणे,विजय वाटकर,व वार्डातील इतर नागरिक उपस्थित होते .













