नागपूर(आशिष गोंडाणे):- कोरोना महामारी काळात पालकांच्या नौकऱ्या गेल्या, काही पालकांना वेतन मिळत नव्हते यामुळे मुलांच्या फी भरल्या नाही याची माहिती महात्मा गांधी इंग्लिश मिडीयम हायस्कूल,वानाडोंगरीचे प्राचार्य यांना भेटून विनंती अर्ज करून तर पालकांनी काही फी भरल्या नंतरही शाळेने १६८ पालकांना वकिल देवदत्त देशमुख याचे कडून नोटीस पाठवली यामुळे पालकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पालकांनी फी भरली नाही म्हणजे पालकांनी शाळेची फसवणूक केली आहे. १५ दिवसात शाळेची फी भरली नाही तर पालकांवर सिव्हिल व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. असे नोटीसीत नमूद केले आहे. हिंगणा तालुक्यातील ही पहीला शाळा आहे.जिने कोरोना महामारी काळात फीसाठी पालकांना नोटीस बजावली. शाळेने वकिला कडून नोटीस पाठवण्यापुवी १६८ मुलांची ऑनलाईन क्लासेस बंद करण्यात आले. एवढेच नाही तर जानेवारी महिन्यात शाळेकडून परीक्षा घेण्यात आली या परीक्षेपासून १६८ मुलांना वंचित ठेवण्यात आले. ज्या पालकांनी फी भरली आहे त्याचे पाल्यांना देखील ऑनलाईन क्लासेस व परीक्षेपासून वंचित ठेवले आहे. वकीलांचे नोटीसीत मागणी करण्यात आलेली फी जास्तची मागणी करण्यात आल्याने पालंकात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. सिव्हिल व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. सामान्य नागरिक कोर्ट कचेरी पासून दूर राहण्याची मनस्थिती असते परंतु केवळ फी साठी शाळेने हे वकीलाची नोटीस पाठवली त्यामुळे पालकात भीतीचे वातावरण निर्माण झाले.या बाबत शिक्षण विभाग या शाळा व्यवस्थापन या वर काय कारवाई करते. पालकांना कोर्टाच्या चकरा माराव्या लागेल .अशी चर्चा परिसरात रंगली आहे .













