भामरागड (गडचिरोली):– भामरागड नगर पंचायत मध्ये आज नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व आदिवासी विद्यार्थी संघटना यांच्यात युती करण्यात आली होती. भामरागड नगर पंचायत मध्ये १७ प्रभाग असुन बहुमतासाठी नऊ नगरसेवक आवश्यक असतात भामरागड मध्ये भारतीय जनता पार्टीचे पाच आविसचे तीन अपक्ष एक असे संख्याबळ करून बहुमत सिद्ध करण्यात आले.
भामरागड नगर पंचायत मध्ये आदिवासी विद्यार्थी संघाचे विदर्भ नेते माजी आमदार दिपक आत्राम,जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेत्रुत्वात लालसु आत्राम व श्रीकांत बंडामवार यांच्या मार्फतीने सत्ता स्थापन करण्यात आली.
भामरागड नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष म्हणून भाजपा च्या रामबाई महाका या नऊ मतांनी विजयी झाल्या तर , उपाध्यक्ष म्हणून आविस चे विष्णु मडावी यांची निवड झाली.यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक,तेजस्वीनी मडावी,सरजु सड़मेक,दिलीप ऊईके,सचीरेखा आत्राम,राकेश महाका,कविता चेतमवार लक्ष्मी आत्राम उपस्थित होते.तसेच अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे,भाजपाचे उपाध्यक्ष सुनील बिश्वास,अहेरीचे शहर अध्यक्ष प्रशांत गोडसेलवार,शामराव येरकलवार,तपेश,देवा बिश्वास,जगदीश भाऊ,गणेश नागपूरवार,व भाजपा व आविसचे कार्यकर्ते उपस्थित होते













