गोंडपिपरी – भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात गोंडपिपरी तालुक्यातील तोहगाव सह विविध गावात नागरिकांना राज्य व केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दि (१५) बुधवारी देण्यात आली.
या अभियानात अंत्योदय योजना, सशक्त शेतकरी समृद्ध भारत, सबका साथ सबका विकास, पायाभूत सुविधांचा अभूतपूर्व विकास आरोग्य धनसंपदा, महिला शक्ती नवी गती ,राज्यातील पायाभूत सुविधांचा विकास सामाजिक न्याय,कृषी कल्याण गड किल्ल्यांचे व तीर्थक्षेत्रांचे संवर्धन आदीं योजनांची माहिती देण्यात आली .नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आव्हान नगरपंचायत गोंडपिपरी नगरसेवक राकेश पून, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बंडू गौरकार
गणेश डहाळे, प्रकाश रापलवार यांच्यासह भाजपचे बूथ प्रमुख योगेश खामनकर , राहूल खोब्रागडे, अतूल बूक्कावार , बंडू दूर्गे , संदिप बूक्कावार , अजय जिरकूंटवार , सौरभ मोरे , आशिष मोरे, रमेश राऊत , यश उत्तरवार , गणपत धोटे , देवराव टेकाम ,संजय धोटे , प्रदिप निवलकर व पदाधिकारी-कार्यकर्ते सक्रियतेने या अभियानात सहभागी झाले होते.