मूल :-
चार दिवसापूर्वी तहसील कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने राजू भावराव भेंडारे (३८) राहणार चिचाळा, यांच्या मालकीचा रेती भरलेला ट्रॅक्टर पकडला.रेती तस्करी करीत असल्याने त्याचे ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.शासन निर्णयाप्रमाणे ट्रॅक्टर सोडविण्याकरिता एक लाख 25 हजाराचा दंड आकारण्यात आला. एवढी मोठी रक्कम देणे राजूला शक्य झाले नाही. ट्रॅक्टर सोडविण्याकरिता एक लाख 25 हजार रुपये दंडाची रक्कम जुळवाजुळव करण्याकरिता, तो मित्रांकडे नातेवाईकांकडे फेर्या मारीत होता.अशाच एका नातेवाईकाकडे पैसे आणण्याकरिता जात असताना, चंद्रपूर रोडवर नागाळा नजीक राजू चा अपघात झाला आणि त्यात तो दुर्दैवाने मृत पावला.राजू भेंडारे सोबत आणखी एक त्याचा साथीदार होता,तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचाराकरिता चंद्रपूर येथे नेण्यात आले आहे.
आज सकाळी त्यांनी अनेक मित्रांकडे दंड भरण्याकरिता काही रक्कमेची मदत करावी म्हणून विनंती करीत होता,
राजू भेंडारे, यांना दोन अपत्य असून, घरची शेती विकून त्यांनी ट्रॅक्टर घेतली होती हे विशेष.













