मूल :- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आ.राजेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर येथे झालेल्या बैठकीत प्रगतशील शेतकरी म्हणुन ओळख असलेल्या प्रशांत मेश्राम यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मूल तालुका सचिव पदावर आ.राजेंद्र जैन आणि जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.
मूल तालुक्यातील मारोडा या गावचे राहिवासी असलेल्या प्रशांत मेश्राम यांची परिसरात अत्यंत युवा प्रगतशील शेतकरी म्हणुन ओळख आहे. सतत ते शेतकऱ्याच्या संपर्कात राहून आधुनिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करीत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मंगेश पोटवार यांनी त्यांना तालुका सचिव पदाची महत्वाची जबाबदारी देत त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न आणि जणसामान्यांचे प्रश्न आणि विधायक कामे सोडविण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली. त्याच्या नियुक्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मारोडा परिसरात जनतेचा भक्कम पाठिबा मिळेल अशा चर्चा जनतेतून उमटत आहेत.
त्यांनी आपल्या नियुक्तीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर,तालुका अध्यक्ष मंगेश पोटवार यांना दिले असुन त्यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आकाश येसनकर,महिला अध्यक्ष संगीता गेडाम,धारा मेश्राम,आनंदराव गोहने,शैलेश निमगडे,वासुदेव पिपरे,दामोधर सोनुले यांनी अभिनंदन केले आहे.