चंद्रपूर : आदिवासी माना जमातीची संस्कृती, इतिहास, चालीरीती व सण उत्सवाची जनजागृती व्हावी व नागदिवाळीचे ऐतिहासिक महत्व समाजापर्यंत पोहचणे गरजेचे आहे. त्याकरिता भद्रावती तालुक्यातील पावना (रै.) येथे राजमाता माँ. माणिका सामाजिक संस्था तर्फे नागदिवाळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या महोत्सवाचे उदघाटन आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पावना पोलीस पाटील वर्षा घागी, कल्पना बारेकर, वंदना नन्नावरे, वंदना दाते, पार्वता ढोक, प्रतिभाताई ढोक, मीरा सावसाकडे, सुलोचना झाडे, कुंदा शेंडे, आरती तुमराम, शुभांगी शेंडे, संघमित्रा बेंदले, अल्का दानव, रीमा घरत, सुगंधा शेन्डे, संघमित्रा बेंदले, अलका दानव, रीमा घरत, सुगंधा शेंडे, मंजू दानव यांची उपस्थिती होती.