राजुरा(चंद्रपूर ) : धनोजे कुणबी युवा व क्रीडा मंडळ व राजुरा पत्रकार असोसिएशन राजुरा द्वारा आयोजित धनोजे कुणबी प्रीमिअर लीग सिजन ३ चे उदघाटन शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर (दि.१२) संपन्न झाले. यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना माजी आमदार वामनराव चटप सांगितले आहे की, इतर खेळापेक्षा क्रिकेट खेळामध्ये शरीराचा व्यायाम जास्त होत असून प्रत्येक खेळाडूने खिलाडी वृत्ती जोपासत खेळणे आवश्यक असून मागील तीन वर्षांपासून धनोजे कुणबी प्रीमिअर सिजन ३ राजुरा विधानसभा क्षेत्रातील खेळाडूंना संधी देत असून याचा फायदा ग्रामीण व शहरी भागातील खेडाळूना होत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे उदघाटक मनोहर पाऊनकर, अध्यक्ष माजी आमदार वामनराव चटप होते तर विशेष अतिथी माजी आमदार सुदर्शन निमकर, संजय धोटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, राजुरा पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष एजाज अहमद, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अविनाश जाधव, धनोजे कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष दौलतराव भोंगळे, सचिव देवराव निब्रड, युवानेते मयूर पाऊनकर, माजी नगरसेवक राजेंद्र डोहे, नरेंद्र काकडे, संतोष देरकर, श्रीकृष्ण गोरे, दिलीप वांढरे, भाऊराव बोबडे, यांची उपस्थिती होती.
यावेळी देवराव भोंगळे यांनी खेळाडूंना मार्गदर्शां करताना सांगितले की, राजुरा येथील युवकांची क्रीडा क्षेत्रात सुरू असलेली वाटचाल ही भविष्यात राज्यामध्ये डिकेपीएल नावाचे ब्रँड समोर आल्याशिवाय राहणार नाही. माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी युवा पिढीनी शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्राकडे लक्ष देऊन करिअर घडविण्याचे आव्हान करीत डिकेपीएल ची सुरु असलेली घौडदौड कायम राहतील असा विश्वास व्यक्त केला. माजी आमदार संजय धोटे यांनीही पंधरा दिवस चालणाऱ्या डिकेपीएल मधील खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन केतन जुनघरी यांनी केले तर आभार सचिन भोयर यांनी मानले कार्यक्रमाच्या अयोजनाकरिता धनोजे युवा क्रीडा मंडळ व पत्रकार असोसिएशनचे कार्यकर्ते राजकुमार डाखरे, संतोष देरकर, सचिन भोयर, केतन जुनघर, रतन काटोले, पत्रकार सागर भटपल्लीवार, फारुख शेख, साहिल सोळंके, वसंता पोटे, प्रफुल शेंडे, अमित जयपूरकर, मंडळाचे कार्यकर्ते उत्पल गोरे, मयूर झाडे, निलेश भोयर, चेतन सातपुते, हर्ष बोबडे, अनिकेत बेलखेडे सह आदींनी सहकार्य केले.