कोरची (गडचिरोली ) स्वच्छ भारत मिशन पंचायत समिती कोरची तर्फे स्थानिक श्रीराम महाविद्यालय कोरची येथे स्वच्छ भारत मिशन टू टप्पा अंतर्गत 31 जानेवारी 2022 ते 6 फेब्रुवारी 2022 आयकानिक सप्ताहाच्या निमित्ताने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छ पर्यावरण या विषयावर ऑनलाइन निबंध स्पर्धा घेण्यात आली.
ही स्पर्धा वर्ग नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये घेण्यात आली यावेळी श्रीराम महाविद्यालयातील एकूण 17 विद्यार्थी सहभागी झाले होते. सुदृढ आरोग्य आणि शुद्ध पिण्याचे पाणी लोकांना कोणत्या कारणामुळे मिळेल ही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जागृतता निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांनी आपला गाव आपलं घर स्वच्छ आणि निरोगी पर्यावरण रहित कसा राहील याविषयी या माध्यमातून आपले मत मांडने होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डी एन गजभिये सहाय्यक शिक्षक आर एल भानारकर सहाय्यक शिक्षक के एस झोडे तसेच पंचायत समिती येथील समुह समन्वयक मोहन इरले,समुह समन्वयक ललित ताराम यावेळी उपस्थित होते.