गोंडपिपरी :-(सुरज माडूरवार)
तेलंगणासिमेवरील आदिवासीबहूल उद्योगविरहीत तालुका अशी गोंडपिपरी तालुक्याची ओळख राहिली आहे.या तालुक्यात रोजगाराच्या संधी नाहीत.मुख्य व्यवसाय असलेल्या शेतीचा हंगाम आटोपला की तालुक्यातील मंडळी उदरनिर्वाहासाठी परप्रांतात धाव घेतात.तालुक्यात बेरोजगारांची संख्या दिवसांगणिक वाढतेय.अश्यातच शेजारच्या गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड आणि कोंसरी प्रकल्प रोजगारासाठी आशेचा किरण ठरेल असा विश्वास नागरिकांना होता मात्र तोच प्रकल्प आता सर्व सामान्य नागरिकांच्या जीवावर उठला आहे.लोहखनिज घेऊन जाणाऱ्या हायवा अपघातात अनेकांना जीव गमवावा लागत असल्याने आता संताप व्यक्त केल्या जात आहे.
दि.(१६) गुरुवारी रात्री ३ वाजता दरम्यान चंद्रपूर कडून येणाऱ्या भरधाव हायवाने उभ्या असणाऱ्या दोन चारचाकी वाहने व स्कुटीला धडक देत वाहने चेंदामेंदा केल्याची संतापजनक घटना घडली.
चंद्रपूर कडून येणाऱ्या MH-40-CM-8318 हायवाने मुख्य मार्गावर घर असलेल्या विकी ताडूरवार यांच्या मालकीच्या MH 34AM 0519 कार,MH 34AH 8716 स्कुटिला व मनोज बट्टे यांच्या मालकीच्या MH 34CD 2478 कारला जोरदार धडक दिली.धडक रात्री असल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही.दिवसा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी टायर वर्क्स दुकान असल्याने नागरिकांची गर्दी असते .घटना रात्री घडल्याने मोठा अनर्थ टळला मात्र लाखोंची नुकसान झाली.चार दिवसांपूर्वी कोठारी मार्गावर हायवा दुचाकीच्या धडकेत गोडपिंपरी तालुक्यातील दोन युवकांना जीव गमवावा लागला होता. सुरजागड येथून होणारी वाहतूक मार्गावरील नागरिकांसाठी जीवघेणी ठरत आहे. अपघातात अनेकांचा जीव जाऊन कुटुंब उध्वस्त होत आहे. यावर शासनाने प्रतिबंध करणे अत्यावश्यक आहे आहे.
बॉक्स –
पावसाने वाचवला अनीलचा जीव…..
ज्या ठिकाणी हायवाने वाहनांना उडविले.त्याच्या बाजूला अनिल कुळमेथे याचे घर आहे.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनिल त्या ठिकाणी झोपलेला होता मात्र पावसाला सुरुवात झाल्याने तो घरी गेला.आणि काही क्षणातच हा अपघात घडला त्यामुळे पावसाने अनिलचा जीव वाचवला तो सुखरूप आहे.
बॉक्स –
गोंडपिपरी ते चंद्रपूर मार्गावर वाहने विरुद्ध दिशेने येताना मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे. रस्ता अरुंद असल्याने हायवा रस्त्याखाली उतरून देखील त्या ठिकाणी अपघात होत आहे .त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा मुरुमाचे काम करावे व गोडपिंपरी शहरातून वाहने नेत असताना. वेग मर्यादा पाळावी. सूरजागड वाहतूक जीवघेणी ठरत आहे. आतापर्यंत अपघातात ज्यांनी जीव गमावला त्यांच्या कुटुंबीयांना १० लाखाची मदत करावी.या मागणीसह अन्य मागण्या घेऊन लवकरच तीव्र आंदोलन करणार.
– सारिका मडावी ,उपनगराध्यक्ष नगरपंचायत गोंडपिपरी