गोंडपिपरी –
गोंडपिपरी तालुक्यात रेतिघाटाचे लिलाव झाले होते.घाटाची मुदतही संपली त्यानंतर महिनाभर रेती उचलण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली.मुदतवाढ संपल्या नंतरही तालुक्यात मोठ्या प्रमाणात जागोजागी रेतीचे ढिगारे दिसत असल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
शहरातील मुल रोड रस्त्यालगत शेकडो ब्रास रेतीची साठवणूक केली आहे.मोठे रेतीचे असणारे ढिगारे वैद्य की अवैध शोधणे प्रशासणासमोर आव्हान आहे. आहे.सोबतच रेती घाटालागत असणाऱ्या विट्ठलवाडा,वढोलीसह अनेक गावांत रेतीचे ढिगारे दिसतात.ही रेती कायदेशीर की बेकायदेशीर आहे अशी चर्चा परिसरात सुरू आहे.या गंभीर प्रकाराकडे प्रशासन लक्ष देणार का ..? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन केले जात असून रात्रंदिवस मोठ्या गाड्यांनी रेतीची वाहतूक केली जाते.अनेक कारवाया महसूल विभाग, पोलीस विभाग करत असते तरी सुधा तालुक्यातून रेती तस्करी रोखन्याय प्रशासनाला यश आले नाही.
गोंडपिपरी तालुका नद्यांनी वेढलेला आहे.नागरिक पूर्णतः नैसर्गिक शेतीवर अवलंबून असून उद्योग विरहित तालुका म्हणून ओळखला जातो.अशात रेतीमाफीयांची गोंडपिपरी हब बनले आहे.
रेती व्यवसायिकांना अधामधात शासनाकडून मुदत वाढ मिळत असते.रेती साठा वाहतूक करण्याची परवानगी मिळाल्याचा गैरफायदा घेत त्यांनी अनेक ठिकाणी मोठे रेतीचे ढिगारे उभे केले आहेत.रेती साठा उचलण्याची परवानगी संपली असून आता ते अवैध रेती साठे असलेल्या ठिकाणावरून चोरटी वाहतूक करत आहे.जादा भावाने रेती विक्री सुरू आहे.
तालुक्यातील रेती घाट बंद आहे.रेती तस्करांनी अनेक रेती जागोजागी स्टॉक करून बेभाव विक्री करत आहे.अवैध रेतीसाठे जप्त करून घरकुल धारकांना मोफत रेती उपलब्ध करून द्यावी – तुकाराम सातपुते युवासेना तालुका प्रमुख गोंडपिपरी