नागपूर :- महाराष्ट्रासह विदर्भात खळबळ माजविणाऱ्या वर्धा हिंगणघाट जळीतकांड प्रकरणात प्रा.अंकिता हिला जिवंत जाळणारा विकी उर्फ विकेश नगराळे याला हिंगणघाट जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाने हत्या प्रकरणात दोषी ठरवले होते. अंकिता ला जाऊन बरोबर दोन वर्षे झाली आहेत त्यामुळे तिला खऱ्या अर्थाने ही श्रद्धांजली आहे.
आज न्यायालयाने आरोपी विकेश नगराळे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही मरेपर्यंत जन्मठेप न्यायालयाने हे देखील सांगितले आहे की आरोपी विकेशला 3 फेब्रुवारी ला अटक झाली होती. या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात आला होता या प्रकरणात महिला तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी तृप्ती जाधव यांनी कार्यालयीन कामकाजाच्या 19 दिवसात दोषारोपपत्र पूर्ण केले शिवाय 28 फेब्रुवारीला या प्रकरणातील आरोपी विकी उर्फ विकेश नगराळे याच्याविरुद्ध तब्बल 426 पानाचे दोषारोपपत्र हिंगणघाट च्या प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केले होते. ते या प्रकरणात 64 सुनावण्या घेत 29 साक्षीदाराचे प्रत्यक्ष जबाब नोंदविण्यात आले.महाराष्ट्र सरकारने दखल घेत सदर प्रकरणाची सुनावणी जलदगतीने न्यायालयांमध्ये होईल असे घोषित केले तसेच सरकारतर्फ विशेष सरकारी वकील नेमण्यात आले. महाराष्ट्र सरकारने पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. विकृत मानसिकतेला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उचललेल्या कठोर पावलांबद्दल मी महाराष्ट्र सरकारचे खूप खूप आभार मानू इच्छिते.तसेच आज आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झाल्यामुळे एक प्रकारे अशा विकृत मानसिकतेला धाक बसला असुन आजच्या आरोपीला झालेल्या जन्म ठेपेच्या शिक्षेमुळे आजचा दिवस पिडितेला श्रद्धांजली ठरली आहे.अशी प्रतिक्रिया सह्याद्री न्यूज शी बोलतांना प्रा.शिल्पा बोडखे. (पुर्व विदर्भ महिला संपर्क संघटक व प्रवक्ता,शिवसेना) यांनी दिली