गोंडपिपरी :- (सुरज माडुरवार) :- कला वाणिज्य महाविद्यालय गोंडपिपरी व शिक्षण महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी(दि.६) मराठी विभागातर्फे डॉ.दिलीप अलोणे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला.”यही हे जिंदगी” या शिर्षकाखाली मनावस्था व मनावरचा ताण कमी करण्यासाठी व चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी अध्यक्षस्थानी विद्याभारती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुभाषसिंह गौर,प्रमुख उपस्थिती सचिव दिपक गुंठेवार,राजिवसिंह चंदेल,प्राचार्य लता जांभुळकर,शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य रश्मी मोटघरे आदिंची मंचावर उपस्थित होती. प्रा.दिलीप अलोने यांनी विद्यार्थ्यांची हितगुज साधत आयुष्य कस जगायचं याबद्दल मार्गदर्शन केले सोबतच जीवनात कितीही संकटे आली तरी आनंददायी जिवन जगा चेहऱ्यावर हास्य ठेवा चेहऱ्यावरील हास्य लढण्यासाठी बळ देईल असे मत व्यक्त केले .कार्यक्रमाला महाविद्यालयीन प्राध्यापक वृंद व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुधीर पोटवार तर आभार प्रदर्शन प्रा.वसंत चव्हाण यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.