मुलचेरा: मैदानी खेळ विसरल्याने अलीकडे आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत आहेत. हल्लीचे युग हे धावपळीचे आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक साधने करमणुकीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे अनेक जण मैदानावर खेळायला जाणेच विसरले आहेत, परंतु त्याचे दुष्परिणामही भोगावे लागत आहेत. त्यामुळे सर्वांगीण विकासासाठी मैदानी खेळ हे खूप गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी जि प अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांनी केले.मुलचेरा तालुक्यातील अतीदुर्गम अश्या भागात राणी दुर्गावती क्रिडा क्लब मच्छीगट्टा तर्फे हॉलीबॉल स्पर्धेचे चे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेचे उद्घघाटन त्यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दिवाकर उराडे उपसरपंच ग्रा.प.येल्ला,प्रमुख अतिथी सत्यवान सिडाम माजी सरपंच येल्ला, सौ.वैशाली सोयम सरपंच ग्राम पंचायत येल्ला, बालाजी सिडाम माजी सरपंच ग्रा. प. येल्ला, प्रकाश आत्राम पेसा अध्यक्ष नागुलवाही,नरेश राऊत ग्रा.प.सदस्य येल्ला,चिरंजीव शुभम कुत्तरमारे,नागेश मडावी आशुतोष पिपरे होते आणि खेळाडूसह फुटबॉल प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना बॉलीवूड मधील अनेक दिग्गज कलाकारांनी सुद्धा खेळावर आधारित चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेल्या आहेत. यावरून उत्तम आरोग्यासाठी मैदानी खेळ हे किती आवश्यक आहे हे वेगळी सांगण्याची गरज नाही. पूर्वी कुस्ती, कबड्डी, वीटदांडू आदी खेळ हे कुठेही फावल्या वेळामध्ये मुले खेळत असे. मात्र अलीकडे मुले एकत्र येऊनही या खेळाऐवजी आपापल्या मोबाईल मध्ये गेम खेळण्यातच दंग असतात. सोबत असूनही त्यांना एकमेकांना बोलण्यासाठी ही पुरेसा वेळ मिळत नाही. घरी सुद्धा पालकांचे मुलांवर अभ्यासाचा दबाव असतो. रिकामा वेळ मिळाला तर त्यांच्या हातात मोबाईल किंवा टीव्हीचा रिमोट दिला जातो. त्यामुळे कार्टून पाहण्यात किंवा मोबाईल गेम खेळण्यातच वेळ जातो. रिकामा वेळ मिळूनही ते इलेक्ट्रॉनिक साधनातच रमून जातात. त्यामुळे मैदानी खेळच मुले काही प्रमाणात विसरत आहेत. मैदानी खेळ न खेळल्यास मुलांना अभ्यासातही निराशा येतो, आडस येतो, तसेच कोणतेच काम करण्यासाठी उत्साह वाटत नाही. मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी मैदानी खेळ हे खूप आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.