गडचिरोली:- बाल वयात बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक विकासही तितकाच महत्त्वाचा असतो. म्हणून सर्वांनी आपल्या मुलांना शालेय जीवनात खेळासाठी नेहमी प्रोत्साहन दिले पाहिजे.आपल्या भागात उत्कृष्ठ खेळाडू आहेत.मात्र,त्यांच्यासाठी क्रीडांगण नाही.येत्या काळात युवकांच्या शारीरिक विकासासाठी क्रीडांगण विकसित करून देणार असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी केले.राजर्षी शाहू महाराज मागासवर्गीय कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था आलापल्ली संचालित लक्ष्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, अहेरी द्वारा ‘सत्कार गुणवंतांचा व यशवंताचा’ कार्यक्रम नुकतेच घेण्यात आले होते.यावेळी विशेष अतिथी म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने म्हणून उत्कृष्ठ खेळाडू,कास्य पदक विजेते तथा अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी,राष्ट्रीय धावपटू सौ नम्रता ओतारी,प्राचार्य मंडल, प्राचार्य मेश्राम,प्राचार्य कोड़ेलवार,प्राचार्य भोंगड़े,नगरसेवक विकास उईके,शालिनी पोहनेकर,अमोल गुडेलीवार आदी मान्यवर उपास्थित होते.
2017 पासुन तर 2022 पर्यंत शासकीय सेवेत रुजू झालेल्या लक्ष्य अकॅडमीचे विद्यार्थी गणेश देवकते,नेहा डोके,दानिश शेख,अंकित नल्लूरवार,स्वामी पसपुरवार,वसीम शेख,रवितेजा अलाम,सुमित येलपुर वार,निर्णय जांभुडे, जोगा आत्राम, सूरज साखरे,शुभम शेंडे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.या प्रसंगी लक्ष्य अकॅडमीमार्फत घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेत अव्वल अलेल्या राजकीरण गुरनुले, अवनीत गव्हारे,गौतम झाड़े तीन विद्यार्थ्यांना रोख रक्कम व पारितोषिक देऊंन सत्कार करण्यात आला तर,25 शालेय विद्यार्थ्याना प्रोत्साहन पर पारितोषिक देन्यात आले.
पुढे बोलताना आत्राम यांनी लक्ष्य अकॅडमीचे कौतुक करतानाच खेळाडू असलेले ओतारी दाम्पत्याचेही कौतुक केले.जीवनात खेळाला किती महत्व आहे हे ही पटवून दिले. तहसीलदार ओतारी यानी प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन यश कसं प्राप्त करायच यावर मार्गदर्शन केले.सौ.नम्रता ओतारी यानी स्वता मुलीना प्रशिक्षण दिले होते.त्यामुळे त्यानी सुद्धा जिल्ह्यातील मुलांमुलीमध्ये असलेले क्रीडागुण ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन केल्यास जिल्ह्यातही उत्कृष्ट खेळाडू घडतील असे विधान केले.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, नागरिक,पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजर्षी शाहू महाराज संस्था अध्यक्ष गिरीश मद्देर्लावार, प्रास्ताविक लक्ष्य एकेडमीचे सतीश पानकंठीवार, विनोद दहागावकर यानी आभार मानले.