नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतमल्लिकार्जुन खरगे विजयी झाले असून उमेदवार शशी थरूर यांनी खरगे यांचे अभिनंदन केले आहे. मल्लिकार्जुन खरगे हे निवडणूक जिंकणार असा दावा निवडणुकीपूर्वीपासूनच केला जात होता. खरगे हे गांधी घराण्याचे निकटवर्तीय आणि विश्वासू नेते आहेत. ८० वर्षांचे खरगे हे कर्नाटकातील आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते पदाचा आधीच राजीनामा दिला आहे. निवडणुकीत ७ हजार ८९७ मतं मिळवून खरगे विजयी झाले. तर थरूर यांना १ हजार ७२ मतं मिळाल्याने त्यांचा पराभव झाला.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गेल्या २४ वर्षांमध्ये प्रथमच झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सोमवारी ९६ टक्के मतदान झाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात अध्यक्षपदाची सरळ लढत होती. काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण? हे आज झालेल्या मतमोजणी अंती स्पष्ट झाले. नवीन अध्यक्ष निवडीमुळे काँग्रेस मध्ये नवचैतन्य बघायला मिळत असून विरोधकांकडून नेहमी घराणेशाहीचा केला जाणारा आरोप हि खोटा ठरला असल्याच्या प्रतिक्रिया जनमाणसातून येत आहे . तर काँग्रेस चे अर्जुन मल्लिकार्जुन अशा प्रतिक्रिया सोशल मीडियातून येत आहेत .